EVM Misuse Protest: कळस परिसरात ईव्हीएम गैरवापराच्या आरोपांवर तीव्र आंदोलन

ईव्हीएम बिघाड व व्हीव्हीपॅट पडताळणी न केल्याचा आरोप; निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरणाची मागणी
EVM Misuse Protest
EVM Misuse ProtestPudhari
Published on
Updated on

विश्रांतवाडी: कळस गावठाण येथे आज शिवसेना (शिंदे गट) व कळस परिसरातील नागरिकांनी ईव्हीएम मशीनचा गैरवापर होत असून, मशीनमध्ये बिघाड असूनही मतदान प्रक्रिया राबविल्याचा आरोप करीत तीव निषेध आंदोलन केले.

EVM Misuse Protest
Pune Ratnagiri Hapus Mango: गुलटेकडी मार्केट यार्डात हंगामपूर्व हापूसची पहिली आवक

ईव्हीएम मशिनमध्ये बटणांचा बिघाड तसेच व्हीव्हीपॅट (ततझअढ) स्लिपद्वारे मतदान पडताळणी न केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केल्याचे आंदोलकांनी सांगितले. या वेळी ‌‘ईव्हीएम हटाव, देश बचाव‌’च्या घोषणा दिल्या.

EVM Misuse Protest
Jilha Parishad Election EVM: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदानयंत्रांची उपलब्धता चौपट

या आंदोलनात कळस परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनची बटणे व्यवस्थित कार्यरत नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या होत्या. स्लिपचा वापर करून मतदानाची पडताळणी करण्यात आली नाही. प्रभाग एकमधील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात होती.

EVM Misuse Protest
Mula Mutha River Pollution: मुळा-मुठा नदीतील ऑक्सिजन पातळी घसरली; सीडब्ल्यूपीआरएसचा गंभीर अहवाल

यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन मतदानाची टक्केवारी घटली, असे या वेळी आंदोलकांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया संशयमुक्त व विश्वासार्ह राहावी, यासाठी निवडणूक आयोगाने वरील मुद्द्‌‍यांवर लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणीही आंदोलकांनी केली. तसेच, योग्य व समाधानकारक खुलासा न झाल्यास लोकशाही मार्गाने अधिक तीव आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

EVM Misuse Protest
GBS Outbreak Pune: जीबीएस उद्रेकाला वर्ष पूर्ण; तरीही महापालिका अद्याप निष्क्रिय

या वेळी माजी नगरसेवक सतीश म्हस्के, गिरीश जैवळ, मीनाक्षी म्हस्के, विवेक बनसोडे, हेमलता बनसोडे, प्रदीप रावते, जनार्दन वाघमारे, मारुती जाधव, युवराज बनसोडे, नानासाहेब देवकर, आशा परदेशी, वंदना देवकर, कमल देवकर, प्रमिला देवकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news