पाटस : पुढारी वृत्तसेवा : कुसेगाव (ता. दौंड) येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने सव्वा तास अधिक वेळ मतदान केंद्र बंद आहे. ३१ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असताना सव्वा सातच्या सुमारास मशीन बंद पडले आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांना याचा त्रास सहन करावा लागला. सव्वा नऊच्या दरम्यान मतदान केंद्र सुरळीत झाले. सव्वा तासांपेक्षा अधिक वेळ मतदान प्रक्रिया बंद असल्याने महिला व नागरिक त्रास सहन करावा लागला.
सव्वा तास मतदान केंद्र बंद असल्याने मतदान करण्यासाठी आलेल्या महिला व नागरिक माघारी घरी गेले. यामुळे याला जबाबदार कोण अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहेत. नागरिकांनी मतदान केल्यावर ईव्हीएम मशीनमधून आवाज येत नसल्याचे नागरिकांच्या लक्ष्यात आल्याने मशीनमध्ये बिघाड झाला असल्याचे समजले. ३१ मतदान केलेली मशीन सील करण्यात आली आहे. त्याजागी दुसरी मशीन जोडण्यात आली.
हेही वाचा