Pune Paper Leak : तिसरी ते नववीच्या परीक्षेचे प्रश्नोत्तर फोडले, पुण्यात तीन युट्यूब चॅनल्सविरोधात गुन्हा

YouTube channels FIR | पेपर फोडल्याप्रकरणात खासगी यूट्यूब चॅनेलवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Pune Paper Leak
Paper Leak(Pudhari File Photo)
Published on
Updated on

School Exam Paper Leak

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या तिसरी ते नववीच्या परीक्षेचे पेपर व त्यांची उत्तरे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी ने घेता प्रसारित केली. पेपर फोडल्याप्रकरणात आता खासगी यूट्यूब चॅनेलवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्युशन क्लासेस या तीन खासगी यूट्यूब चॅनेलची नावे समोर आली आहेत.

याप्रकरणी सहायक संचालक प्रभाकर शिंदे (वय ५०, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट २०२५ रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला. त्यानुसार खासगी यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकाराला प्रतिबंध करण्याबाबत विधिनियमाच्या विविध कलमान्वये तसेच माहिती तंत्रज्ञान, भारतीय न्यायसंहितेच्या ७२, २२३ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Pune Paper Leak
Pune Crime News: काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारींसह पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

तक्रारदार संगीता शिंदे या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे सहायक संचालकपदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राज्य शासनाने २०२१ पासून इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होऊन प्रथम भाषा मराठी, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी सुरू केली आहे. त्यानंतर २०२३ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदच्या वतीने राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय व अनुदानित शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता परिषदेतर्फे पायाभूत चाचणी ६ ऑगस्ट २०२५ ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली होती.

Pune Paper Leak
Pune News:"मराठी संस्कृतीला बदनाम करणारे तुम्ही गुंड आहात"; पुणे मनपा आयुक्तांनी मनसे नेत्यांना सुनावले, महापालिकेत राडा; पहा Video

त्यानुसार सर्व जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी, सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी, सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई या सर्वाची पत्रव्यवहार केला होता. दि. १७ जुलै ते दि. ३१ जुलैपर्यंत परिषदेच्या वतीने परीक्षेसाठी लागणारे पेपर खासगी कार्गो कंपनीमार्फत पाठविण्यात आले होते. त्यानंतर ६ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता एका यूट्यूब चॅनेलवर संबंधित जिल्ह्यांना पाठविलेल्या चाचणी पत्रिका त्यापैकी सातवीचे मराठीचे पेपर, ५ ऑगस्टला झालेला व ७ ऑगस्टला होणार्‍या सातवी आठवीचे गणिताचे पेपर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, या यूट्यूब चॅनेलची माहिती घेतल्यानंतर चॅनेल हे कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्युशन क्लासेस या तीन यूट्युब चॅनेलची नावे पुढे आली. या खासगी यूट्यूब चॅनेलने कोणतीही परवागी न घेता अज्ञाताकडून हे पेपर मिळवून या चॅनेलवर प्रश्न व त्यांची उत्तरे प्रसारित करून शासकीय आदेशाचा भंग केला. त्यानुसार या चॅनेलवर गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news