पुणे : बेकायदा होर्डिंग उभारल्यास मिळकतीवर चढणार बोजा

पुणे : बेकायदा होर्डिंग उभारल्यास मिळकतीवर चढणार बोजा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिका हद्दीत अनधिकृतपणे होर्डिंग उभारणार्‍या जागा मालक, सोसायटीचे चेअरमन किंवा सचिवाच्या मिळकतीवर 50 हजार रुपयांच्या दंडाचा बोजा चढविण्यात येणार आहे. दरम्यान, अनधिकृत मात्र नियमात बसणारे होर्डिंग नियमितीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, आतापर्यंत 250 अर्ज आल्याची माहिती आकाशचिन्ह आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा होर्डिंग आहेत. मध्यंतरी होर्डिंग्जचा वाद न्यायालयामध्ये गेल्याने कारवाईवर मर्यादा येत होत्या. आता मात्र महापालिकेने बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी 10 जणांचे पथक तयार केले आहे. नियमित होऊ शकणार्‍या होर्डिंग्जला कायदेशीर मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत होर्डिंग्जच्या परवानगीसाठी सुमारे 250 अर्ज आले आहेत. जागा पाहणी व सर्व कागदपत्रांची तपासणी करूनच शुल्क आकारून होर्डिंगला मान्यता देण्यात येणार आहे.
यानंतरही बेकायदा होर्डिंग आढळल्यास व ते उभारणारे न आढळल्यास होर्डिंग ज्या जागेवर उभारले आहे, त्या जागा मालकांना अथवा सोसायटीचे चेअरमन आणि सचिवाला 50 हजार रुपये दंड आकारून दंड भरण्यास नकार दिल्यास त्यांच्या मिळकतीवर बोजा चढविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news