तरसाच्या हल्ल्यातून उद्योजक बचावले

तरस
तरस

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  जंगली तरसाने पाठलाग केल्याने उद्योजक माउली कानडे यांनी पळ काढून स्वत:चा बचाव करून घेतला. त्यांच्या सतर्कतेमुळेचे थोडक्यात बचावले. कळंब (ता. आंबेगाव) येथील शाळेच्या मैदानावर शनिवारी (दि.24) पहाटे पावणेपाच वाजता ही घटना घडली. ज्ञानेश्वर कानडे हे फेरफटका मारण्यासाठी नेहमीप्रमाणे शाळेच्या मैदानावर गेले. खो खोच्या खांबाजवळ बसले असता अंधारामध्ये तरस प्राणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मोबाईलचा दिवा लावला असता जंगली तरसाने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर कानडे यांनी तेथून पळ काढल्याने ते या घटनेतून थोडक्यात बचावले.

कळंब शाळेला कमलजादेवी क्रीडा मंडळ, कळंब यांनी दिलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही घटना कैद झाली आहे. घटनेची माहिती उपसरपंच संतोष भालेराव यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्याजवळ उपलब्ध असलेले दोन हॅलोजन शाळेच्या मैदानावर भरपूर प्रकाश पडेल व इतर ज्येष्ठ नागरिकांनाही मैदानावर त्रास होणार नाही, या उद्देशाने लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जंगली तरसाचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच उषा कानडे, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व शिक्षकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news