पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलव्दारे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षांच्या नोंदणीच्या तारखा सीईटी सेलने जाहीर केल्या आहेत.
सीईटीसेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, एमबीए, एमसीए आणि पाच वर्षे विधी प्रवेश परीक्षेच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. तर आता एमपीएड आणि बीएड साठी 9 ते 18 मार्च, विधी तीन वर्षे साठी 15 ते 25 मार्च, बी.पी.एड साठी 20 ते 30 मार्च आणि एम.एड साठी 23 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान नोंदणी करता येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले