

तळेगाव स्टेशन: भागातील इंद्रायणी वसाहत येथील सह्याद्री सहकारी गृहरचना संस्था येथे वीजपुरवठ्याचे १५ बिलींग मीटर आग लागून जळून खाक झाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही. ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. वीज महावितरणचे कर्मचारी राहुल जाधव आणि सचिन गोपाळे यांनी संबंधीत भागातील वीजपुरवठा तातडीने बंद केला. तळेगाव नगर परिषदेच्या अग्नीशमन कर्मचाऱ्यांनी, इमारती मधील रहिवाशांनी आणि सभोवतालच्या रहिवाशांनी एकत्रितपणे आग विझवली. असे प्रकार धोकादायक आहेत,अर्थिक नुकसानीचेही आहेत यासाठी वीजग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. लूज कनेक्शन,स्पार्किंग बाबत दक्ष राहीले पाहिजे. उंदीरांनी वायरी कुरतडू नये यासाठी उपाययोजना केली पाहीजे.