पुणे: वीजेच्या तारा जमिनीपासून अवघ्या पाच फुटांच्या अंतरावर, वाडा पुनर्वसन येथील प्रकार; दुर्घटनेची दाट शक्यता

पुणे: वीजेच्या तारा जमिनीपासून अवघ्या पाच फुटांच्या अंतरावर, वाडा पुनर्वसन येथील प्रकार; दुर्घटनेची दाट शक्यता
Published on
Updated on

कोरेगाव भीमा, पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील भीमा येथील फरशी ओढा रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या वीज महावितरण कंपनीच्या खांबांवरील तारा पाच फुटांवर खाली आलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून तातडीने या तारांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसननजीक नगर रस्ता ते ढेरंगे वस्तीकडे जाणाऱ्या फरशी ओढा रस्त्याच्या बाजूने महावितरण कंपनीच्या खांबावरुन विद्युत तारा गेलेल्या आहेत. मात्र या तारा आता जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या जमिनीच्या बाजूने अवघ्या पाच फुटांवर खाली आलेल्या आहेत. परिणामी या ठिकाणी शॉक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परिसरातील शेतकरी, रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक आपला जीव मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास करत आहेत. गंभीर बाब म्हणजे पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील या ठिकाणाहून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. जवळच लोकवस्ती आहे. भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून लवकरात लवकर तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी नितीन महाजन यांच्याशी संपर्क केला असता 'कोरेगाव भीमा येथील कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आहे. लवकरात लवकर या तारांची दुरुस्ती करण्यात येईल,' असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news