इलेक्ट्रिक वाहनांचेही वाजणार पिप..पिप..; व्हॉईस अलर्ट सिस्टीमवर संशोधन सुरू

इलेक्ट्रिक वाहनांचेही वाजणार पिप..पिप..; व्हॉईस अलर्ट सिस्टीमवर संशोधन सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इलेक्ट्रिक वाहने आपल्या शेजारून गेली तरी अनेकदा त्याचा नेहमीच्या इतर वाहनांसारखा आवाज होत नाही. त्यामुळे पादचारी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने अ‍ॅकॉस्टिक्स व्हॉईस अलर्ट सिस्टीम बसवण्यावर सध्या 'एआरएआय' संशोधन करत असून यासंदर्भात केंद्र सरकारला काही शिफारसी देण्यावर आम्ही काम करीत आहोत, अशी माहिती एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी दिली.

डॉ. रेजी म्हणाले, की, आजवर अवजड वाहनांचे चार्जिंग करण्यासाही 100 किलो व्हॅटचा एसी/ डीसी चार्जर वापरला जायचा आता एआरएआयने 100 किलो व्हॅट पेक्षा जास्त क्षमतेचा चार्जर विकसित करण्यावर भर दिला आहे. याचबरोबर अवजड वाहनांसाठी ओव्हरहेड चार्जिंग सिस्टम विकसित करण्याचे देखील काम चालू आहे. अवजड वाहनांच्या डोक्यावर याचा चार्जिंग पॉईंट असेल, त्यामुळे सुरळीतपणे विनाअडथळा अवजड वाहनांचे चार्जिंग वेगाने होणे शक्य होईल. एआरएआयतर्फे तळेगाव दाभाडे जवळील ताकवे येथे सुमारे 146 कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्सच्या गाड्यांच्या चाचण्या करण्यासाठी 20 एकर जागेमध्ये एक विशेष ट्रॅक तयार करण्यात आला आहे. भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तिथे सीम्यूलेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तशा परिस्थिती निर्माण करून चाचण्या केल्या जाणार आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news