अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा | पुढारी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणाला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आपले फोटो कुटुंबीयांसह संपूर्ण गावातील मुलांना दाखवेन अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या विशाल शशिकांत पाटणे (वय 25, रा. कन्हेरी, ता. खंडाळा, जि.सातारा) यास न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणात, आईच्या फिर्यादिवरून राजगड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील, साक्षीदार हे फिर्यादी यांचे शेजारी आहेत. त्यांच्याकडे घोड़े असून, ते लग्नकार्यात आणि लग्नाच्या वरातीमध्ये घोडे नाचवतात. आरोपी हा त्यांचा मदतनीस म्हणून काम करतो. त्यावेळी आरोपी हा साक्षीदाराच्या चुलत्याच्या बंगल्याच्या टेरेसवर मुक्कामाला असायचा.

यादरम्यान, आरोपीने पीडित मुलीला टेरेसवर भेटायला बोलावले आणि मुलीवर बलात्कार केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
या गुन्हयाचा तपास पुणे ग्रामीण चे आर. एम. साबळे यांनी केला. अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्ट्टी यांनी काम पाहिले. आरोपी हा 27 जून 2021 पासून कारागृहात आहे. या केसमध्ये पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार एएसआय विद्याधर निचीत आणि जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पृथ्वीराज ताटे होते.

हेही वाचा

Back to top button