लोणावळ्यात चोरीचे पाच गुन्हे उघडकीस

file photo
file photo

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

लोणावळा : लोणावळा शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार आणि पुण्यातील एका चोरीच्या गुन्ह्यासह पाच गुन्हे उघडकीस आणले असून, याप्रकरणी आठ गुन्हेगारांना अटक केली आहे. यामध्ये लोणावळ्यातील एका अल्पवयीन अट्टल गुन्हेगारांचा समावेश आहे.

चिंतन लक्ष्मण पाठारे (वय-19, रा. ओळकाईवाडी, कुसगाव, लोणावळा), शेखर मारुती मंजुळे (वय -19, रा. कुसगाववाडी, कुसगाव बुद्रूक, लोणावळा), आकाश भरत ओव्हाळ (वय-24, रा. केवरेगाव, लोणावळा), सबरोज अहमद निहाज अहमद मुजावर (वय-24, रा. डोंगरगाव, मावळ), रफिक शमशेर पठाण (वय-24, रा. देवणी, लातूर), रविशंकर रामदास गौतम (वय-30, रा. कानपूर, उत्तरप्रदेश, सध्या वलवण पुलाजवळ, लोणावळा), निखिल महेंद्र निकाळजे (वय -26, रा. नांगरगाव, लोणावळा) अशी चोरी, दरोडा व मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लोणावळा शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून चोरी, दरोडा व मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमधील गुन्हेगारांना शोधण्यासाठी व अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक व लोणावळा शहर पोलिस निरीक्षक स हताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील पोवार, पोलिस उपनिरीक्षक लतिफ मुजावर, सुनील वाणी व लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे मयुर आबनावे, राजेंद्र मदने, मनोज मोरे, स्वप्निल पाटील, रमेश उगले, विरसेन गायकवाड यांच्या पथकाने तांत्रिक व गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे वरील गुन्हेगारांचा शोध घेत त्यांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेत अटक केली. यामध्ये दोन सराईत गुन्हेगारांचा समावेश असून, यात लोणावळ्यातील एका अल्पवयीन अट्टल गुन्हेगाराचा समावेश. संबंधित अल्पवयीन गुन्हेगारावर लोणावळा शहर व ग्रामीण आणि पुण्यात असे पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत.

संबंधितांकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 52 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल आणि चोरी केलेली व चोरीसाठी वापरलेली तीन वाहने जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन सराईत गुन्हेगाराची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनांचा पुढील तपास लोणावळा शहर सहायक पोलिस निरीक्षक सुनील पोवार व पोलिस उपनिरीक्षक लतिफ मुजावर हे करीत आहेत.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news