पुणे जिल्ह्यात लसीकरणासाठी प्रयत्न पडताहेत तोकडे

पुणे जिल्ह्यात लसीकरणासाठी प्रयत्न पडताहेत तोकडे
Published on
Updated on

ज्ञानेश्वर भोंडे

पुणे : पुणे जिल्ह्यात लसीकरणाची, विशेषकरून दुसर्‍या डोसचीगाडी पुढे सरकताना दिसत नाही. जिल्ह्यात अजूनही 16 लाख नागरिकांचा दुसरा डोस झालेला नाही. त्यांनी वेळेवर डोस घ्यावा, यासाठी आरोग्य खात्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र ते तोकडे पडत असल्याचे दिसून येत आहे.

लसीकरण सुरू होऊन आता 14 महिने झाले आहेत. 16 जानेवारी 2021 ला लसीचा पहिला डोस टोचला गेला, तेव्हापासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यात पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि पुणे ग्रामीण मिळून 15 ते 60 वयोगटात 91 लाख 50 हजार जणांना पहिला तर 75 लाख लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दोन्ही मिळून पुणे जिल्ह्यात 1 कोटी 78 लाख डोस देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या अनुमानानुसार पुणे जिल्ह्यात 86 लाख लाभार्थी आहेत. मात्र, डिसेंबर महिन्यातच या सर्वांना डोस मिळाला असून, आता इतर ठिकाणच्या पुण्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना डोस देण्यात येत आहे. अशाप्रकारे पुण्यात आतापर्यंत 91 लाख 50 हजार जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.

डोस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून लाभार्थ्यांना कॉल करण्यात येतो. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून जनजागृती करण्यात येते. स्वयंसेवी संस्थादेखील आवाहन करतात. तसेच 'आशा' कार्यकर्त्या सर्व्हे करून लाभार्थ्यांना लसीकरणाबाबत सांगतात.

– डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी

अशी आहे जिल्ह्यातील स्थिती

  • जिल्ह्यात एकूण लाभार्थी – 86 लाख
  • 15 व त्यापुढील वयोगटात पहिला डोस दिलेले – 91 लाख 50 हजार
  • याच वर्गवारीत दुसरा डोस दिलेले – 75 लाख
  • दुसरा डोस मिळणे बाकी असलेले – 16 लाख

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news