पिंपरी : ‘पीएमआरडीए’ हद्दीतील सुविधा भूखंडाचा ई-लिलाव

पिंपरी : ‘पीएमआरडीए’ हद्दीतील सुविधा भूखंडाचा ई-लिलाव
Published on: 
Updated on: 

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत उपलब्ध 12 सुविधा क्षेत्राचे भूखंड 80 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्टयाने देण्यात येणार आहे. त्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भूखंडासाठी पीएमआरडीएने लघुत्तम किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या तिजोरीत 35 कोटी 49 लाख रुपयांच्या उत्पन्नाची भर पडणार आहे.

पीएमआरडीएने मुळशी तालुक्यात येणार्‍या हिंजवडीतील 4, मानमधील 3, पिरंगुटमधील 2 भूगावमधील 2 आणि कासार अंबोली मधील 1 असे एकूण 12 सुविधा भूखंड 12 एप्रिल रोजी होणार्‍या ई- लिलावाद्वारे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कमीत कमी 1003.63 चौरस मीटर तर, जास्तीत जास्त 8470 चौरस मीटर क्षेत्रादरम्यान हे भूखंड आहेत.

त्यासाठी इच्छुक लिलावधारकांना शासनाच्या hrrqt://eaubtion.nib.in या संकेतस्थळावरून 20 मार्च रोजी सकाळी 11 पासून 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नावनोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल. या लिलावाची संपूर्णप्रक्रिया संबंधित संकेतस्थळावरच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

या लिलावप्रक्रियेची संपूर्ण माहिती पीएमआरडीएच्या hrrqt://{mrda.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व भूखंडावर प्राधिकरणाच्या सन 2018 च्या मंजूर विकास नियमावलीनुसार विकास प्रयोजन व चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) अनुज्ञेय होईल. त्यासाठी इच्छुक विकसकांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news