

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी यंदाही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोरदार खरेदी केली. शासनाने जीएसटीत केलेल्या कपातीमुळे वस्तुंच्या किमतीत दहा टक्क्यांनी घट झाली होती, त्यामुळे सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करण्यावर पुणेकरांनी भर दिला, यामुळे शहरातील इलक्ट्रॉनिक्स बाजार आणि छोटी-मोठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीची दुकाने ग्राहकांच्या गर्दीने गजबजल्याचे चित्र पहायला मिळाले.(Latest Pune News)
दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहाने पुणेकरांनी खरेदी करण्याकडे जोर दिला. यात स्मार्ट टिव्ही, वॉशिंग मशीन, फीज, घरगुती गिरणी, लॅपटॉप, मिक्सर ग्रायंडर, मोबाईल, डीएसएलआर कॅमेऱ्यांच्या पुणेकरांनी जोरदार खरेदी केली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसले.
दरम्यान, अनेक वस्तू खरेदीवर विक्रेत्यांकडून मोठ्या सवलती/ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामुळेही अनेक पुणेकरांना या वस्तूंची खरेदी करण्यास भाग पाडले. ऑफर आणि दरामध्ये मिळालेल्या सवलतींमुळे यंदाच्या दसऱ्यात ईलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची यंदा अधिक विक्री होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
यंदा जीएसटीमध्ये मिळालेली सवलत यामुळे ईलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या विक्रीत 20 ते 25 टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. टिव्ही, फीज, मिक्सर ग्रायंडर, वॉशिंग मशिनसह अन्य ईलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. उद्या दसऱ्याच्या दिवशीही या खरेदी करणाऱ्या नागरिकांमध्ये वाढ होईल.
मिठालाल जैन, अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक्स हायरपर्चेस असोसिएशन