पिंपरी : नवरात्रोत्सवाच्या काळात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येणार

पिंपरी : नवरात्रोत्सवाच्या काळात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येणार

पिंपरी : महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात येत्या मंगळवारपासून (दि.27) नवरात्रोत्सवाच्या काळात 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 18 वर्ष वयोगटावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. 5 ऑक्टोंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व माता व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिलेल्या सुचनेनुसार, राज्यात व जिल्ह्यातील 18 वर्ष वयोगटावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांच्या आरोग्य तपासणीसाठी हे अभियान राबविले जाणार आहे. महापालिकेला तशा सविस्तर मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या मोहिमेची सुरुवात मंगळवारी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालय येथे होणार आहे.

डॉक्टर आरोग्य तपासणी करणार
या उपक्रमात पालिका रुग्णालय स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची वैद्यकीय अधिकारी स्वतः आरोग्य तपासणी करतील. आजारी महिलांना आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येईल. तसेच महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्णालय झोनअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहे.

आजारी माता व महिलांना मनपाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता संदर्भित करण्यात येईल. सोनोग्राफी तपासणी आणि कुटुंब कल्याणाबाबतही समुपदेशन करण्यात येणार आहे. तरी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम व शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे यांनी केले आ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news