पुणे : हडपसर उड्डाणपुलाच्या टेस्टिंगमुळे कोंडी पुणे-सोलापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे : हडपसर उड्डाणपुलाच्या टेस्टिंगमुळे कोंडी पुणे-सोलापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Published on
Updated on

हडपसर : पुढारी वृत्तसेवा : हडपसर येथील उड्डाणपुलाचे 'टेस्टिंग' सुरू असल्याने शनिवारी (दि.11) पुलगेटपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाल्याने पोलिस व नागरिक हतबल झाले. हडपसर उड्डाणपुलाच्या खाली महापालिकेकडून तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा उड्डाणपुलावरील वाहतूक दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात लागल्या. यामुळे वाहनचालकांना व नोकरदारवर्गांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

दुचाकीचालकांना अति घाई झाल्यामुळे अनेकांनी अंतर्गत रस्त्यावर वाहने घातली. मात्र, त्या अंतर्गत रस्त्यावरही एकाच वेळेस अनेक वाहने आल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागले. अशा पद्धतीने हडपसरच्या चहुबाजूला चक्काजामची परिस्थिती निर्माण झाली होती. हडपसर वाहतूक शाखेने वाहतूक सुरळीत होण्याकरिता पोलिस कर्मचारी व सिरम कंपनीच्या वतीने वॉर्डन यांची नेमणूक करण्यात आली होती. तरीही मोठ्या प्रमाणावर कोंडी होती. दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर रोडकडे जाणारी एसटी वैभव थिएटर समोर बंद पडली. त्यामुळे वाहनांच्या रांगा रामटेकडीपर्यंत गेल्या होत्या. पुलाच्या कामामुळे पुलावरून पुणे- सोलापूर मार्ग बंद होता. यामुळे सर्व्हिस रोडवरून वाहतूक यंत्रणा सुरू होती. मात्र, सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत सोलापूरच्या दिशेने पुणे सोलापूर एकेरी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हडपसर येथील उड्डाणपुल टेस्टिंगसाठी बंद होता. पुण्याहून सोलापूरसाठी पुलाखालील सर्विस मार्गावरून वाहतूक सुरू होती. प्रत्येक चौकात दोन ते चार वाहतूक पोलिस नेमण्यात आले होते. वाहतूक नियमन करण्यासाठी साहाय्यक वॉर्डन यांची खूप मदत झाली.
            – सुनील जाधव,  पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस, हडपसर विभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news