पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी (दि. 28) अवकाळी पावसाने हजेरी लावली. मंचर परिसरात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे गहू, कांदा उत्पादक शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेले दोन-तीन दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मंचर शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अर्धा तास हा अवकाळी पाऊस पडला. परिसरात सध्या कांदा व गव्हाचे पीक काढणीला आले आहे. अवकाळी पाऊस जर पुन्हा पडला तर या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. मागील सलग दोन वर्षे अवकाळी पावसाचा या दोन्ही पिकांना मोठा फटका बसला आहे. यंदादेखील तीच परिस्थिती उद्भवल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
हेही वाचा