पुणे : फूड डिलेव्हरी अ‍ॅपद्वारे अमलीपदार्थ विक्री; चौघांना अटक

पुणे : फूड डिलेव्हरी अ‍ॅपद्वारे अमलीपदार्थ विक्री; चौघांना अटक
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फूड डिलेव्हरी अ‍ॅपद्वारे पुण्यातील कॉलेज तरुण-तरुणींना अमलीपदार्थाची विक्री करणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एक) अटक केली. त्यांच्याकडून 51 लाख 60 हजार रुपये किंमतीचे एलएसडी स्टॅम्प (17 ग्रॅम वजनाचे 1 हजार 32 तुकडे) जप्त करण्यात आले आहेत. सुशांत काशिनाथ गायकवाड (वय 36, रा. बाणेर, मूळ रा. कोडोली, सातारा), धीरज दीपक लालवाणी (वय 24, रा. पिंपळे सौदागर), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय 25, रा. सनसिटी रोड), ओंकार रमेश पाटील (वय 25, रा.वाकड), तर यापूर्वी रोहन दीपक गवई (वय 24) याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

गवईकडे केलेल्या चौकशीत या चौघांची नावे समोर आली. त्यानुसार पथकाने त्याना बाणेर, सिंहगड रोड, पिंपळे सौदागर व वाकड परिसरातून ताब्यात घेतले. गवई हा एमबीए करतो. तो शेवटच्या वर्षात आहे. तर गायकवाड हादेखील अभियंता आहे. इतर साथीदारसुद्धा उच्चशिक्षित आहेत. मात्र, व्यसन, शौक आणि पार्ट्याच्या नादातून त्यांनी हा अमलीपदार्थ विक्रीचा धंदा केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, पोलिस कर्मचारी विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, सुजित वाडेकर, विशाल दळवी, संदीप शिर्के, राहुल जोशी, नितेश जाधव यांच्या पथकाने केली.

असे करायचे विक्री..

धिरज लालवाणी, दीपक गेहलोत आणि ओंकार पाटील हे तिघे याचे मास्टरमाईंड आहेत. तर गवई आणि इतर हे पेडलर आहेत. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी ही नामी शक्कल लढवली होती. व्हॉटस्अपद्वारे संपर्क साधल्यानंतर डिलेव्हरी देण्यासाठी ते फूड अ‍ॅपद्वारे पार्सल पाठविण्याच्या बहाण्याने ऑर्डर बुक करत होते. समोरील व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करून पाठवले जात होते. त्यामध्ये काय आहे हे डिलेव्हरी बॉयला माहीत नसायचे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news