

पुणे : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत ‘ माझी जमीन माझा हक्क ’ या मोहिमेसाठी महसूल विभागाच्यावतीने राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी भूमिअभिलेख विभागाचे आयुक्त डॉ.सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महसूल आणि भूमिअभिलेख विभागामार्फत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची जमीन विषयक कामे करण्यासाठी विविध कायदे नियम, शासन निर्णय, परिपत्रके आतापर्यत प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार कामकाज करण्यात येत असते. मात्र महसूल विभागाचे कामकाज सर्व सामान्य नागरिकांना समजावे, त्यातील किचकट नियम लागलीच समजावेत, यासाठी राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असते. मात्र हे अभियान अल्प काळासाठी असते. ही बाब लक्षात घेऊन महसूल, मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमिअभिलेख विभागातील कामकाजाची सोडवणूक करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
महसूल, मुद्रांक व नोंदणी आणि भूमिअभिलेख विभागाशी निगडित निवडक कामांचा शोध घेऊन ती कामे निश्चित करणे
महाराष्ट्र जमीन अधिनियमातील तरतूदी, तसेच इतर कायद्यातील तरतूदी , शासन निर्णय, नियम, परिपत्रके यांचा अभ्यास करणे
विविध कामांच्या अमंलबजावणीसाठी ऑनलाईन प्रणाली तयार करणे
निवडण्यात आलेल्या कामांचे मूल्यमापन करणे तसेच त्याची मानके निश्चित करणे
डॉ.सुहास दिवसे ( अध्यक्ष), सर्व महसूल उपायुक्त ( सदस्य), मनिषा जायभाये ( सदस्य), सत्यनारायण बजाज ( सदस्य), संजय बनकर ( सदस्य), दौलत देसाई ( अशासकीय सदस्य), अजय गुल्हाणे ( अशासकीय सदस्य), जगदीश संगीतराव ( अशासकीय सदस्य), पी. आर. कुलकर्णी (अशासकीय सदस्य), भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक ( सदस्य सचिव)