जे वाहनचालक केंद्र शासनाच्या नोकरीत किंवा मल्टिनॅशनल कंपनीत कार्यरत असतात. त्यांची कामानिमित्त भारतभर बदली होत असते. त्यावेळी त्या वाहनचालकांना आपल्या वाहनांचा क्रमांक बदलावा लागतो. मात्र, बीएच सिरीजमधील वाहन क्रमांक असल्यास वाहन क्रमांक बदलावा लागत नाही. अशाच बीएच सिरीजमधील वाहन क्रमांक घेण्यामध्ये 2023 मध्ये चांगली वाढ झाली आहे.– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे