दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलू नका: निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांचे प्रबोधन

दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलू नका: निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांचे प्रबोधन

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा: महिलांनो, लहान मुलांना मोबाईल खेळायला देऊ नका. दिल्यास भविष्यात त्याचे दुष्परिणाम दिसतील. जीवन अनमोल असल्याने मोटारसायकल चालविताना तरुणांनी मोबाईलवर बोलणे टाळावे, असा महत्त्वाचा सल्ला हभप निवृत्तीमहाराज देशमुख इंदुरीकर यांनी दिला. राक्षेवाडी येथील ओमसाई मित्रमंडळाच्या नवरात्र महोत्सवात हभप इंदुरीकर यांचे मंगळवारी (दि. 4) कीर्तन झाले.

कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. शरीररूपी देह अनमोल असल्याने शरीराला सांभाळा, मनातील वासनेला आवर घाला. मोह व मायामुळे बहीण-भावाचे रक्ताचे नातेही संपुष्टात येत आहेत. जास्त ऑक्सिजन तुळस पानातून मिळत असल्याने घरासमोर तुळस लावा आदी मार्गदर्शन त्यांनी केले. ओमसाई मंडळाचे अध्यक्ष दिनेश सांडभोर आणि पदाधिकारी यांनी शाल, श्रीफळ देऊन हभप इंदुरीकर यांचा सत्कार केला. या वेळी बाजार समितीचे माजी उपसभापती अशोक राक्षे, माजी जि. प. सदस्य जितेंद्र राक्षे, विद्या राक्षे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news