पुणे : ‘वर्क फ्रॉम होम ट्रॅपमध्ये अडकू नका’; नारायण मूर्ती यांनी दिला देशाला मंत्र

पुणे : ‘वर्क फ्रॉम होम ट्रॅपमध्ये अडकू नका’; नारायण मूर्ती यांनी दिला देशाला मंत्र
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'मी आठवड्यातील तीनच दिवस काम करतो. वर्क फ्रॅाम होम करतो, हा प्रकार आपल्या प्रगतीस बाधक असून, या ट्रॅपमध्ये अडकू नका,' असा सल्ला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी एशिया इकॉनॉमिक परिषदेत बोलताना दिला. पुण्यात शुक्रवारी सुरू झालेल्या एशिया इकॉनॉमिक परिषदेत इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलाखत 5 एफ वर्ल्ड या कंपनीचे चेअरमन डॉ. गणेश नटराजन यांनी घेतली. या वेळी नारायण मूर्ती बोलत होते.

ते म्हणाले की, 'आपले मूल आळशी व्हावे, हे जगातील कोणत्या आई-बाबांना आवडेल? मी आता 77 वर्षांचा आहे. तरुण असताना दिवसरात्र मेहनत केल्याने इन्फोसिस उभारू शकलो. माझी कंपनी तरुणपणीच उभी केली. माझ्या टीममध्ये सुरुवातीला 7 तरुण होते ते माझ्यापेक्षाही दहा वर्षांनी लहान होते. त्यामुळे वर्क फ्रॅाम होम वगैरे हा प्रकार आपल्याला परवडणारा नाही.'

देशात लवकर निर्णय होत नाहीत…
नारायण मूर्ती म्हणाले, 'आपल्या देशात निर्णय लवकर होत नाहीत. एकटे मोदी काम करतात, पण त्याचे परिणाम खालपर्यंत दिसत नाहीत. प्रत्येकाला वाटते की, आपल्या देशात भ्रष्टाचार आहे. त्यासाठी निर्णय वेगाने घेतले पाहिजेत.'

कोविड, हवामान बदलाने आर्थिक कंबरडे मोडले…
कोरोनाने आमच्या देशांच्या आर्थिक नाड्या आवळल्या, त्यापुढे हवामान बदलाने मोठे संकट आले आहे. बर्फ वेगाने वितळतो आहे. त्यासाठी हवामानावरच सर्वांत मोठे बजेट यापुढे तयार करावे लागणार आहे. जी-20 परिषद आम्हाला आधार वाटत आहे, असे मत भूतान व मालदीव या दोन्ही देशांच्या अर्थमंत्र्यांनी पुणे शहरात सुरू झालेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2023 या परिषदेत व्यक्त केले. गुरुवारी सायंकाळी उद्घाटनाच्या सत्रात भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, भूतानचे अर्थमंत्री लिंपो नामगेय, मालदीवचे अर्थमंत्री इब्राहिम आमिर यांची मुलाखत या परिषदेचे संयोजक गौतम बंबावाले यांनी घेतली.

भारतच आशेचा किरण…
भूतानचे अर्थमंत्री लिंपो नामगेय म्हणाले, 'कोविडने आमच्या देशाला मोठा आर्थिक फटका बसला. त्यातून सावरताना आता बदलते हवामान हे मोठे संकट आहे.' मालदीवचे अर्थमंत्री इब—ाहिम आमिर म्हणाले, 'कोविडने आमची अर्थव्यवस्था 33 टक्क्यांनी खाली आली. त्यानंतर हवामानात बदलासाठी 587 दशलक्ष डॉलरचे नवे बजेट तयार करावे लागले.' भारतच आशेचा किरण असल्याचे या दोघांनी या वेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news