Yerwada Kalas Dhanori nomination: दोन उमेदवारांचे अर्ज बाद; २४८ पैकी २४६ अर्जांना मंजुरी

येरवडा–कळस–धानोरी क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग १, २ व ६ मधील अर्जांची छाननी पूर्ण
Nominations
NominationsPudhari
Published on
Updated on

विश्रांतवाडी : येरवडा- कळस- धानोरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक एक, दोन व सहामधील निवडणूक अर्जांची बुधवारी (दि.३१) छाननी करण्यात आली.

Nominations
Candidate Nomination Scrutiny: धाकधूक संपली; अर्ज छाननीनंतर उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण

छाननीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. येथील निवडणूक कार्यालयात एकूण २४८ अर्ज जमा केले होते. त्यातील दोन अर्ज छाननी प्रक्रियेत बाद केले असून उर्वरित २४६ अर्ज स्वीकारले आहेत.

Nominations
NCP AB Form Controversy: एकाच जागेसाठी दोन एबी फॉर्म; राष्ट्रवादीत उमेदवारीचा मोठा गोंधळ

प्रभाग क्रमांक दोन 'ब' मधील गणेश बाबासाहेब भिसे व प्रभाग सहा 'ब' मधील पूजा विलास काटकर यांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. गणेश बाबासाहेब भिसे यांनी मतदार यादीत नाव असल्याची साक्षांकित प्रत जमा केली नव्हती.

Nominations
Congress candidates PMC election: महानगरपालिका रणधुमाळीत काँग्रेसचे 90 उमेदवार मैदानात

ऑनलाइन तपासणी केली असता भिसे यांचे नाव मतदार यादीत आढळून आले नाही. तसेच, पूजा विलास काटकर (प्र. ६ ब) यांनी नोटेराइझ एफिडेविट जमा केले नव्हते, फॉर्मवर उमेदवाराची सही नव्हती. तसेच, नामनिर्देशन पत्रातील काही रकाने कोरे होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.

Nominations
Prabha Marathe: ज्येष्ठ कथक नृत्य कलाकार व गुरू प्रभा मराठे यांचे निधन

प्रभाग क्रमांक ६ - अ मधून राजेश वाल्हेकर व सिद्धार्थ संजय भालेराव या दोघांनी शिवसेना ठाकरे गटाकडून अर्ज भरले होते. मात्र, राजेश वाल्हेकर यांच्या एबी फॉर्मवर खाडाखोड होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी वाल्हेकर यांना फॉर्मवर केलेली खाडाखोड प्रत्यक्ष दाखवून दिली. त्यामुळे त्यांना आता अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे. तर भालेराव यांचा शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज स्वीकारला गेला आहे, अशीही माहिती बारवकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news