Corona Update 2025: ..अशा रुग्णांना अँटीव्हायरल औषधे देऊ नये; पुणे महापालिकेकडून डॉक्टर- रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

फ्लूसद़ृश आजार असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड देणे टाळावे, असे महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले
Corona Case Update
Corona Case UpdatePudhari
Published on
Updated on
  • प्रतिबंधात्मक उपाययोजना फ्लूसद़ृश लक्षणे असणार्‍या रुग्णांनी मास्क वापरावा.

  • खोकताना व शिंकताना तोंड-नाक झाकण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करावा.

  • वारंवार हात स्वच्छ धुवावे.

  • सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांची लक्षणे अतिसौम्य असल्यास अँटीव्हायरल औषधे न देण्याच्या सूचना डॉक्टर आणि रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. ज्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, परंतु त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, अथवा कोणताही आजार नाही अशा रुग्णांना अँटीव्हायरल औषधे देऊ नयेत. फ्लूसद़ृश आजार असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड देणे टाळावे, असे महापालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. (Pune News Update)

सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर राज्यातही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी महापालिकेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन सविस्तर चर्चा झाली. यावेळी साथरोग अधिकारी डॉ. वैशाली जाधव, राज्य सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. ज्योती गुरव, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. आर.टी. बोरसे डॉ. संजय गायकवाड, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. विशाल कुलकर्णी, डॉ. ज्योती लांडगे, डॉ. चेतन खाडे, डॉ. अमरीश मिश्रा, डॉ. सुधीर पाटसुते, डॉ. स्मिता सांगडे, डॉ. अब्दुल सलाम सुतार आदी उपस्थित होते.

Corona Case Update
Pune News: स्थायी समितीत घाईगडबडीने 66 कोटींच्या निविदेला मंजुरी

खासगी रुग्णालयांना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी बी.जे. मेडिकल कॉलेजकडे पाठवण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सर्व लोकांनी फॅमिली डॉक्टरांनी शिफारस केल्यासच आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. रुग्णालयांनी फेब्रुवारी 2024 मध्ये जारी केलेल्या उपचार प्रोटोकॉलचे पालन करावे. आयएलआयची लक्षणे असलेल्या, ओपीडीमध्ये येणार्‍या लोकांना स्टेरॉइड्स (डेक्सामेथासोन) लिहून देऊ नयेत. रुग्ण रुग्णालयात दाखल असेल आणि गरजेनुसार ऑक्सिजनची आवश्यकता असेल तरच वापरावे. डी-डायमर पातळी जास्त असलेल्या एसएआरआय रुग्णांवर अँटीकोआगुलंट्सने उपचार केले पाहिजेत, असे देखील नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news