Dnyanoba Tukoba Palkhi 2025 | ज्ञानोबा - तुकोबांची पालखी यंदा आळंदीत येणार एकत्र

Tukoba Dashami Halt Alandi | तुकोबांचा दशमीला आळंदीत मुक्काम; दिघी मॅगझिन चौकातून होणार माउलींच्या परतीच्या प्रवासात सहभागी
Dnyanoba Tukoba Palkhi 2025
Alandi Palkhi Together(File Photo)
Published on
Updated on

Alandi Palkhi Together

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जन्मवर्ष व संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठगमन वर्ष अशा दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला परतीच्या प्रवासात आळंदीत दशमीला मुक्कामी येण्याचे निमंत्रण आळंदी देवस्थानने दिले होते. हे निमंत्रण जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानने स्वीकारले असल्याचे संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे यांनी सांगितले. यामुळे यंदा तुकोबांची पालखी आषाढी वारीत परतीच्या प्रवासात रविवारी (दि. २०) आळंदीत दाखल होणार आहे. आळंदीत ज्ञानोबा - तुकोबांची पालखी एकत्र येणार आहे.

माउलींची पालखी दशमीला पुण्याहून निघून आळंदीत सायंकाळी दाखल होत असते. याच दरम्यान दुपारच्या विसाव्याला तुकोबांची पालखी दिघी मॅगझिन चौकातून माउलींच्या पालखीसोबत सहभागी होणार आहे. त्यानंतर दोन्ही पालख्यांचे माउलींच्या थोरल्या पादुका मंदिरात स्वागत करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी सांगितले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरापासून दोन्ही पालख्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. आळंदीत दोन्ही पालख्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीत मुक्कामी राहणार असून, एकादशीला मोशीमार्गे देहूला जाणार आहे.

Dnyanoba Tukoba Palkhi 2025
Alandi: दुर्दैवी! धानोरे येथे विषबाधेने २६ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू

सन १६८५ साली संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी आषाढी वारी पालखी सोहळा सुरू केला. त्या वेळी जाताना व येताना श्री क्षेत्र आळंदीमार्गेच संत तुकाराम महाराज पालखीचा प्रवास होत होता. त्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळणार असल्याचेदेखील मोरे यांनी सांगितले.

Dnyanoba Tukoba Palkhi 2025
Alandi News: पालखी प्रस्थान सोहळा तयारीची लगबग; या दिवसापासून वाहनांना आळंदीत प्रवेश बंदी

सतरा वर्षांपूर्वी आल्या होत्या एकत्र

सन २००८ साली परतीच्या प्रवासात संत तुकाराम महाराजांची पालखी दशमीला आळंदीत मुक्कामी बोलविण्यात आली होती. या वेळी आळंदी देवस्थानने त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर सतरा वर्षांनी पुन्हा तुकोबांची पालखी आळंदीत येत आहे.

भोसरी, मोशीकरांसाठी दुर्लभ योग

भोसरी, मोशी पंचक्रोशीतील गावांना तुकोबांच्या पालखीचा गावातून प्रवास होऊन सहवास व सेवा लाभत नाही. यंदा आळंदीत तुकोबांची पालखी येत आहे. पालखी भोसरीमार्गे येणार आहे. आळंदीतून माउलींचा निरोप घेतल्यानंतर तुकोबांची पालखी मोशी, टाळगाव चिखलीमार्गे देहूत दाखल होणार आहे. यामुळे या गावांना पालखीचे स्वागत करण्याचे भाग्य लाभणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news