बारामतीत पैसे वाटप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल

बारामतीत पैसे वाटप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यानंतर बारामती तालुक्यातही विरोधकांकडून पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचे प्रकार सुरू असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. याच संदर्भाने बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये काल रात्री पावणे अकराच्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बारामती शहराध्यक्ष संदीप गुजर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.

आमदार रोहित पवार यानी अजित पवार मित्रमंडळ भोरमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता. जिल्हा बॅंक उघडी असल्याचा व्हिडिओ समोर आणंण्यात आला होता. त्यानंतर बारामतीतही या गटाविरोधात शरद पवार गटाने तक्रार दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news