पुण्यातून थेट अमेरिका, इंग्लंड, जर्मनीला उड्डाणे

पुण्यातून थेट अमेरिका, इंग्लंड, जर्मनीला उड्डाणे
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातून लवकरच जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिकेसाठी विमानाची उड्डाणे सुरू होणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी केले. शनिवारी सिंधिया यांच्या हस्ते पुणे-बँकॉक विमानसेवेचे ऑनलाइन उद्घाटन झाले. ऑनलाइन पध्दतीने झाले. दिल्लीतूनच कळ दाबून पुण्यातून ही विमानसेवा सुरू झाल्याची घोषणा दिली.

या वेळी त्यांनी केलेल्या ऑनलाइन भाषणात सांगितले की, पुणे हे जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिकेसाठी पोर्ट ऑफ कॉल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात जर पुण्यातील सध्याच्या धावपट्टीचा विस्तार झाला, तर आगामी काळात पुण्यातूनच थेट अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीशी कनेक्टिव्हिटी मिळू शकते.

सिंधिया म्हणाले, पुणे हे माझे शहर आहे, हे देशाचे शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्रसुध्दा आहे. मराठा साम—ाज्याचा सूर्य येथूनच उगवला. या शहराच्या प्रत्येक कणा-कणात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हिंदवी स्वराज्याचे मूळ पुणे शहर आहे. याशिवाय राष्ट्रवाद, साम—ाज्यवादाचे देखील केंद्र देखील आहे. या पुणे शहराची आणि पुणेकरांची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला अभिमान आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी पुण्यातील स्लॉट वाढविले…
पुणे विमानतळ हे भारतीय हवाई दलाच्या अखत्यारीत आहे. दिवसेंदिवस पुणे विमानतळावरून होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत आम्ही केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना पुण्यात 8 स्लॉट वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यांनी आम्हाला तब्बल 14 स्लॉट वाढवून दिले. त्यामुळे विमानतळावर होणारी गर्दी कमी करण्यास आता मोठी मदत होणार आहे, असे सिंधिया यांनी सांगितले.

राज्य शासनाने व्हॅट कमी केल्यास अधिक उड्डाणे…
महाराष्ट्रात विमान कंपन्यांना सेवा सुरू करण्यासाठी 26 टक्के व्हॅट भरावा लागत आहे. इतर राज्यांमध्ये 3 ते 4 टक्क्यांनी व्हॅट कमी आहे. राज्य शासनाने जर व्हॅट कमी केला तर पुणे विमानतळावरून आगामी काळात आणखी उड्डाणे वाढतील. व्हॅट कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. चर्चा सकारात्मक झाली असून, लवकरच निर्णय होईल, असे सिंधिया यांनी सांगितले.

पुणे-बँकॉक सेवा आठवडाभर…
पुणे विमानतळावरून सुरू झालेली पुणे-बँकॉक सेवा सध्या फक्त आठवड्यातून चार दिवस आहे. मात्र, ही सेवा संपूर्ण आठवडाभर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्यामुळे पुणेकरांना लवकरच आठवडाभर ही विमानसेवा उपलब्ध होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत, असे स्पाइस जेटचे व्यवस्थापकीय संचालक अजयसिंग यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news