पिंपरी : पालिका शाळांत ‘वाय-फाय’च्या त्रुटींमुळे डिजिटल शिक्षणाला ‘खो’

Wi-Fi security
Wi-Fi security

दीपेश सुराणा : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील डिजिटल शिक्षणाला सध्या बिघडलेल्या वाय-फाय यंत्रणेमुळे 'खो' बसत आहे. अडथळा जाणवत आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थी टेक्नोसेव्ही व्हावे, या उद्देशाने बसविण्यात आलेल्या स्मार्ट टीव्हीला वाय-फाय कनेक्शन मिळत नसल्याने इंटरनेटवरील शैक्षणिक साहित्य पाहायचे असल्यास शिक्षकांना स्वतःच्या मोबाईलचे हॉटस्पॉट द्यावे लागत आहे. महापालिका 105 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा आहेत. महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे, या उद्देशाने स्मार्ट टीव्ही बसविण्यात आले आहे. त्याशिवाय, शाळांमध्ये कॉम्प्युटर लॅब सुरू करण्यात आलेल्या आहे. दैनिक मपुढारीफच्या प्रतिनिधीने काही शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. त्याबाबतचा सविस्तर वृत्तांत.

नेमकी वस्तुस्थिती

महापालिकेच्या शाळांतील स्मार्ट टीव्हीवर शिक्षकांनी पाठ्यपुस्तक डाऊनलोड करून घेतले आहे. बाराखडी, पाढे त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक साहित्य डाऊनलोड केले आहे. ते विद्यार्थ्यांना शिकविण्यात येते. तसेच, काही शाळांच्या संगणक लॅबमध्ये इंटरनेट सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. तर, काही शाळांच्या संगणक लॅबमध्ये इंटरनेट सुविधा सुरू नसल्याने डिजिटल शिक्षणात अडथळे जाणवत आहेत.

आँखों देखा हाल..

विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालय, पिंपरी " येथील शाळेमध्ये भेट दिली असता शालेय शिक्षणासाठी ई-क्लासरुम संकल्पनेंतर्गत स्मार्ट टीव्हीचा वापर करण्यात येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तथापि, येथील स्मार्ट टीव्हीवर इंटरनेट कनेक्शन नव्हते. त्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत पुरविलेल्या वाय-फाय यंत्रणेचा काहीच फायदा होत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. या स्मार्ट टीव्हीवर इंटरनेटवरील शैक्षणिक साहित्य पाहायचे असल्यास शिक्षकांना स्वतःच्या मोबाईलचे हॉटस्पॉट द्यावे लागत होते. येथील संगणक लॅबमध्ये असलेले वाय-फाय कनेक्शनदेखील मस्लोफ होते. संगणक लॅबमध्ये विद्यार्थ्यांना एमएस वर्ड व अन्य प्राथमिक संगणक शिक्षण दिले जात असल्याची विषयतज्ज्ञांनी दिली.

महापालिका माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर : येथील शाळेमध्येदेखील प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही बसविलेले होते. मात्र, या स्मार्ट टीव्हीचा वापर कमीच होत असल्याचे चित्र दिसले. या स्मार्ट टीव्हीवर विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यात आलेला होता. येथील काही वर्गांमध्ये फळ्यांचा वापरच सुरू होता. येथील स्मार्ट टीव्हींना आणि संगणक लॅबमध्ये असलेल्या संगणकांची वाय-फाय सुविधा बंद होती. शाळेमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत देण्यात आलेले तज्ज्ञ शिक्षक दिवाळीनंतर फिरकलेले नाहीत. त्यामुळे संगणक शिक्षण बंद पडले आहे.

शाळेत दिवाळीपूर्वी वाय-फाय यंत्रणा बसविण्यात आली. मात्र, त्याचे इंटरनेट सारखे बंद पडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्हीवर इंटरनेटचा वापर करायचा असल्यास स्वतःच्या मोबाईलचे हॉटस्पॉट द्यावे लागत आहे. महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे, या उद्देशाने स्मार्ट टीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संगणक शिक्षणासाठी संगणक लॅब बसविल्या आहे. त्यासाठी आवश्यक इंटरनेट सुविधादेखील देण्यात आली आहे.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण विभाग.

स्मार्ट टीव्हीवर आम्ही पाठ्यपुस्तक, बाराखडी, पाढे डाऊनलोड केले आहे. यूट्युब, गुगल आदींवरील शैक्षणिक साहित्य, चित्रकला, कार्यानुभव आदींशी संबधित सहित्य पाहता येते. येथे सुरू असलेली मवाय-फायफ यंत्रणा सध्या कॉम्प्युटर लॅबपुरती मर्यादित आहे.
     – श्यामल दौंडकर, शिक्षिका, विद्यानिकेत प्राथमिक विद्यालय, पिंपरी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news