पत्रकार दराडेंचं ‘ऋषी सुनक’ आणि ‘सुंदर पिचाई’ वर्ल्ड बुक फेअरमध्ये

पत्रकार दराडेंचं ‘ऋषी सुनक’ आणि ‘सुंदर पिचाई’ वर्ल्ड बुक फेअरमध्ये

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेली पुस्तके दिल्लीतील वर्ल्ड बुक फेअरमध्ये झळकत आहेत. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत.

दिल्लीतील बुक फेअरमध्ये युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद असल्याचे दिगंबर दराडे यांनी सांगितले. ते म्हणाले, दिल्लीमध्ये हिंदी आणि इंग्लिश पुस्तकांना युवक आणि युवतीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरूणांच्याकडून या पुस्तकाचे विशेष कौतुक होत आहे.

नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी देखील 'ऋषी सुनक' आणि 'सुंदर पिचाई' या पुस्तकांचे कौतुक केले आहे. पुण्यातील एकमेव असलेल्या मराठी पुस्तकांच्या स्टॉलला मराठे यांनी भेट दिली. यावेळी सुनक आणि पिचाई यांच्या पुस्तकांचे त्यांनी कौतुक केले. तरुण पिढींला ही पुस्तके निश्चित प्रेरणादायी ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा. मंजिरी नितीन गजरे यांनी अनुवादित केलेल्या 'सुंदर पिचाई' हिंदी पुस्तकाला अधिक मागणी आहे. मायमिरर प्रकाशनचे मनोज अंबिके म्हणाले, दिल्ली या ठिकाणी प्रगती मैदानावर भरलेल्या बुक फेअरला पाहण्यासाठी जगातून वाचक येत आहेत. अठरा फेब्रुवारी पर्यंत हे बुक फेअर सुरू राहणार आहे. मुख्यतः हिंदी भाषिक राज्यांतून 'सुंदर पिचाई' आणि 'ऋषी सुनक' या पुस्तकांना अधिक मागणी आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news