राजगुरूनगर : धुम स्टाईलने ५ तोळ्यांचे मंगळसुत्र हिसकावले

राजगुरूनगर : धुम स्टाईलने ५ तोळ्यांचे मंगळसुत्र हिसकावले

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून धुम ठोकल्याचा प्रकार राजगुरूनगर लगतच्या ढोरेभांबुरवाडी (ता. खेड) येथे ३ नोव्हेंबरला भर दुपारी तीनच्या सुमाराला घडला. विमल ज्ञानेश्वर कोतवाल (वय ४५) यांनी खेड पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

काही महिन्यांपूर्वी अशा धुम स्टाईल चोऱ्या तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घडत होत्या. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी यातील बाहेरच्या तालुक्यातील आरोपींना ताब्यात घेतल्यावर हे प्रकार थांबले होते. पण या घटनेने हे धुम स्टाईल चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र उभे राहिले आहे.

विमल कोतवाल या एकट्या ढोरेभांबुवाडी येथील पीरसाहेब बाबा मंदिरासमोरील रस्त्यावरून दुपारी तीनच्या दरम्यान चालल्या होत्या. समोरुन दुचाकीवरून दोन अनोळखी युवक वेगात आले. जवळ येताच त्यांच्या दुचाकीचा वेग कमी झाला. अचानकपणे मागे बसलेल्या युवकाने गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र हाताने हिसकावले व वेगात धुम ठोकली. ४ मणी, लांब पट्टीचे मंगळसुत्र व त्यात दोन वाट्या असा २ लाख २५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक भारत भोसले व पथक धुम स्टाईल चोरट्यांचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news