Pune Crime: पुण्यात खळबळ; धायरीत सासऱ्याने केला सुनेचा खून

कौटुंबिक वादातून भीषण घटना; आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

पुणे/धायरी: कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली आहे. सुनेचे डोके भिंतीवर आपटल्यानंतर दगडाने मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर सासरा घराला कुलूप लावून पसार झाल्याचे समोर आले आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Murder Case
Pune Night School HSC Result: रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

स्वाती तेजस चौधरी (वय 31) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी सासरा भानुदास भास्कर चौधरी (वय 57) यांच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.02) रायकर मळा धायरी परिसरात घडली आहे. याबाबत तेजस चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी कुटुंबीय मूळचे जळगाव येथील राहणारे आहेत.

Murder Case
Pune HSC Success Story: कचरा संकलन करणाऱ्या विद्यार्थिनींची बारावी परीक्षेत यशस्वी भरारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती चौधरी यांचे पती तेजस चौधरी हे शिवाजीनगर न्यायालयात क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते न्यायालयात गेले होते. त्यामुळे घरी सहा महिन्यांच्या बाळासह स्वाती आणि तिचे सासरे होते. स्वाती आणि त्यांचे सासरे भानुदास चौधरी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत असत. शनिवारी सकाळी साडेनऊ ते बारा वाजताच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

Murder Case
Pune Bal Pustak Jatra 2026: पुणे बाल पुस्तक जत्रेत रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

या दरम्यान स्वाती या बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या असताना भानुदास चौधरी तेथे गेले. त्यांनी स्वाती यांचे डोके भिंतीवर आपटले आणि कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाने त्यांना मारले. त्यामध्ये स्वाती यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून पळ काढला. तेजस यांच्या बहिणीने वहिणी स्वाती हिला फोन केला होता. मात्र, तो काही उचलला नाही. त्यानंतर तिने भावाला फोन केला. ते कोर्टात गेले होते. शेवटी तिने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला फोन करून घरी काय झाले ते पाहण्यास सांगितले.

Murder Case
Pune ACB Bribe Case: पुण्यात महिला API 28 लाखांची लाच घेताना पकडली

त्या वेळी घरात स्वाती यांचे सहा महिन्यांचे बाळ होते. त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर स्वाती यांचे पती तेजस चौधरी यांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी भानुदास चौधरी फरार असून, नांदेड सिटी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news