Dhankawadi Ward 37 Election Result: पुणे महापालिका निवडणूक: धनकवडी–सहकारनगर प्रभाग ३७ मध्ये भाजपचा क्लीन स्वीप

अटीतटीच्या लढतीनंतर चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी
Dhankawadi Ward 37 Election Result
Dhankawadi Ward 37 Election ResultPudhari
Published on
Updated on

​पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ३७ (धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय) मध्ये कमालीची उत्कंठा पाहायला मिळत आहे. पाच फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, दिग्गज उमेदवारांच्या मतांमधील चढ-उतार पाहून कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची प्रचंड गर्दी दिसली, प्रत्येक फेरीच्या निकालानंतर घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

Dhankawadi Ward 37 Election Result
Kasba Ward Result 2026: पुण्यातील कसब्यात पुन्हा कमळाचा दबदबा; रुपाली ठोंबरेंचा गदारोळही निष्फळ

प्रभाग ३७ मधील चारही जागांसाठी (अ, ब, क आणि ड) चुरस पाहायला मिळत आहे. पाचव्या फेरीअखेर आकडेवारी समोर आली. किशोर धनकवडे यांनी पाचव्या फेरीअखेर २६,९४१ मतांसह मोठी आघाडी घेतली अन विजयाकडे कूच केली. वर्षा तापकीर यांनी २३,४४४ मते घेत आपली आघाडी मजबूत ठेवली असली, तरी नेहा कुलकर्णी यांच्या मतांची वाढ चुरस निर्माण करत होती. अखेर पाचव्या फेरीअंती तापकीर यांनी जागा ब मध्ये विजय मिळवला. तेजश्री बदक १४,२६२ आणि श्रद्धा परांडे १२,०५६ मते यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. ही जागा कोणाकडे जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, पाचव्या फेरीअंती त्यांच्या लढतीतील चित्र समोर आले आणि तेजश्री बदक यांनी जागा क मध्ये विजय मिळवला.

Dhankawadi Ward 37 Election Result
Pune Municipal Election Result 2026: पुण्यातील या प्रभागांत संध्याकाळी पाचनंतर मतमोजणी, निषेधाच्या घोषणा, दगडफेक अन् केंद्राबाहेर आंदोलने

जागा ड मध्ये अरुण राजवाडे यांनी १५,०३३ मतांनी आघाडी घेतली होती, तरी आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत १०,६६१ ही नावे चढाओढ कायम ठेवून असल्याचे फेऱ्यात दिसून आले, मात्र अखेर राजवाडे यांनी आघाडी घेत जागा ड मध्ये विजय मिळवला.

Dhankawadi Ward 37 Election Result
Kothrud Ward Result: कोथरुडमधील प्रभागात भाजपला धक्का, प्रभाग क्रमांक 11 मध्ये उलथापालथ

मतमोजणी केंद्राबाहेर प्रत्येक फेरीच्या अनाउन्समेंटनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत होता. गुलालाची उधळण आणि विजयाच्या घोषणांनी धनकवडी- सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता.

Dhankawadi Ward 37 Election Result
Pune Mahapalika Election Results 2026: औंध, बोपोडीत भाजपने उडवला विरोधकांचा धुव्वा, चारही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 37 - धनकवडी-कात्रज डेअरी

भाजपचे चारही उमेदवार विजयी ...

  • किशोर धनकवडे - 26,941

  • वर्षा तापकीर - 23,444

  • अरुण राजवाडे - 15033

  • तेजश्री बदक - 14,261

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news