Dhanakwadi Illegal Flex Action: धनकवडीत अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई; कात्रज-आंबेगावात मोहीम

महापालिकेकडून 40 फ्लेक्स, 70 पोस्टर्स हटवले; अनधिकृत जाहिरातींवर कारवाईचा बडगा
Dhanakwadi Illegal Flex Action
Illegal Flex ActionPudhari
Published on
Updated on

धनकवडी: शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका ठरणारे अनधिकृत जाहिरात फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टर्सवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयाच्या परवाना व आकाश चिन्ह विभागाने सोमवारी (दि. 27) रात्री आंबेगाव आणि कात्रज परिसरात कारवाई मोहीम राबवली.

Dhanakwadi Illegal Flex Action
Khadakwasla PHC Staff Absent: खडकवासला PHC मध्ये कर्मचारी गैरहजर; रुग्णांची ताटकळ

काश्मीर मैत्री चौक (सरहद कॉलेज), चंद्रभागानगर चौक, जांभूळवाडी रस्ता आणि आंबेगाव गायमुख परिसरातील अनधिकृत फ्लेक्सवर ही कारवाई करण्यात आली. या वेळी 40 फ्लेक्स व बोर्ड, 70 हून अधिक पोस्टर्स काढण्यात आले. तसेच जाहिराती लावण्यासाठी उभारण्यात आलेले 8 लाकडी पहाड जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.

Dhanakwadi Illegal Flex Action
Vimannagar Waste Mafia: विमाननगरमध्ये कचरा माफियाचा सुळसुळाट; व्यावसायिकांकडून अवैध वसुली

महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परवाना विभागाचे निरीक्षक नितीन जगदाळे, सचिन बोडके आदींच्या पथकाने ही कारवाई केली. नागरिक आणि व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावू नयेत. अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे परवाना व आकाश चिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news