

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : पारगाव परिसरात मोकाट कुर्त्यांकडून शेतात घेतलेल्या पिकांची नासधूस सुरू आहे. टोळक्याने येऊन कुत्री पिकांचे नुकसान करत आहेत, यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, शिंगवे परिसरात गेले अनेक दिवसांपासून मोकाट कुर्त्यांनी धुमाकूळ घातला आहे. ही कुत्री टोळक्याने फिरत आहेत.
10 ते 15 कुत्री एकत्र रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. सध्या या परिसरात गहू, हरभरा या पिकांचे नुकसान कुत्री करत आहेत. या पिकांमध्ये कुत्री लोळण घेत आहेत, तर उभ्या पिकांमध्ये भांडणे करत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. या रोजच्या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या मोकाट कुत्र्यांच्या त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे