

बारामती: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वादाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शासन शासनाची भूमिका पार पाडत असते. वर्षानुवर्षे चालत आलेली वारीची परंपरा आहे. आम्ही फक्त नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतो, अशी भूमिका उपमुख्यमंत्री पवार यांनी मांडली. बारामती येथील प्रशासकीय भवनात माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, शासनाचे वेगवेगळे विभाग पालखी सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदार्या पार पडतात. शासनाच्याही अनेक दिंड्या यात सहभागी होतात. पालखी सोहळ्यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनीही बैठका घेतल्या आहेत. (Latest Pune News)
सरकारी यंत्रणेने त्यांचे काम केले आहे. चौदाशे दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये दिले आहेत. विविध ग्रामपंचायतींना खर्चासाठी अनुदान दिले आहे. पुणे महानगरपालिका आर्थिक बाबतीत सक्षम आहे. मी मतदान संपल्यावर मुंबईला जाणार आहे. 30 जून रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी उद्यापासून माझ्या बैठका सुरू होत आहेत.