पुणे; पुढारी वृत्तसेवा: सोलापूर विभागातील दौंड-मनमाड विभागात सुरू असलेल्या तांत्रिक कामामुळे रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम झाला असून, यामुळे पुण्यातून सुटणार्या रेल्वे गाड्या प्रशासनाने रद्द केल्या आहेत. यात अजनी-पुणे एसी एक्स्प्रेस 04, 11 आणि 18 ऑक्टोबर रोजी रद्द राहील तर पुणे-अजनी एसी एक्स्प्रेस 07, 14 आणि 21 ऑक्टोबर रोजी रद्द राहणार आहे. तसेच, अन्य काही रेल्वे गाड्यांवर देखील याचा परिणाम झाला असून, त्या रद्द करण्यात आल्या आहेत, याची प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अ.क्र. रेल्वे गाडी/एक्स्प्रेस रद्द राहण्याचा दिनांक
1) पुणे-अमरावती एसी एक्स्प्रेस 05, 12, 19 ऑक्टोबर रोजी रद्द.
2) अमरावती-पुणे एक्स्प्रेस 06, 13, 20 ऑक्टोबर रोजी रद्द.
3) नागपूर-पुणे गरीब रथ एक्स्प्रेस 04, 07, 09, 11, 14, 16 आणि 18 ऑक्टोबर रोजी रद्द.
4) पुणे-नागपूर गरीब रथ एक्स्प्रेस 05, 08, 10, 12, 15, 17, 19 रोजी रद्द.
5) पुणे- अजनी एक्स्प्रेस 08 आणि 15 ऑक्टोबर रोजी रद्द.
6) अजनी – पुणे एक्स्प्रेस 09 आणि 16 ऑक्टोबर रोजी रद्द.
7) पुणे – अजनी एक्स्प्रेस 06 आणि 13 ऑक्टोबर रोजी रद्द.
8) अजनी – पुणे एक्स्प्रेस 07 आणि 14 ऑक्टोबर रोजी रद्द.
9) पुणे – नजीबाबाद डेमू 16 ते 18 ऑक्टोबर रोजी रद्द.
10) नजीबाबाद – पुणे डेमू 17 ते 19 ऑक्टोबरदरम्यान रद्द राहील.