पिंपरी : महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये डेंग्यूचे प्रमाण जास्त

पिंपरी : महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये डेंग्यूचे प्रमाण जास्त
पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये डेंग्यूचे प्रमाण जास्त आढळले आहे. गेल्या दोन महिन्यांतील एकूण डेंग्यू बाधित रुग्णांपैकी 44 पुरुष रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर, 29 महिला रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वयोगटनिहाय विचार करता 21 ते 30 वयोगटातील सर्वाधिक 19 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. शहरामध्ये जानेवारी महिन्यापासून डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळत आहेत. जानेवारीत 261 संशयित रुग्ण आढळले होते.
त्यानंतर फेब्रुवारीपासून ऑगस्टपर्यंत संशयित रुग्ण आढळत आहेत. जुलै आणि ऑगस्टमध्ये संशयित रुग्णांची संख्या वाढली. जुलै महिन्यात 1432 तर, ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत हा आकडा 1100 रुग्णसंख्येच्या वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, जुलै महिन्यापासून डेंग्यूचे बाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैमध्ये 36 बाधित रुग्ण आढळले. तर, ऑगस्टमध्ये गेल्या 23 दिवसांत 37 बाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती महापालिका वैद्यकीय विभागाकडून मिळाली.

वयोगटनिहाय डेंग्यूबाधित रुग्ण (जुलै, ऑगस्ट 2023)

वयोगट      बाधित रुग्ण
10                 10
11 ते 20          8
21 ते 30        19
31 ते 40        10
41 ते 50        14
51 ते 60         7
61 ते 70         4
70 पेक्षा अधिक 1
एकूण

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news