खडकवासला येथे डेंग्यूची साथ सुरू आहे. दाट लोकवस्तीच्या किरकटवाडी, कोल्हेवाडी, धायरी, नन्हे परिसरात गॅस्ट्रो तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. या गावांचा महापालिकेत समावेश होऊन दहा वर्षे झाली असून, हा परिसर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आहे.
जिल्हा परिषदेची सेवा अपुरी पडत आहे, तर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे साथ आटोक्यात आणण्यासाठी अद्यापही कोणत्याही उपाययोजना सुरू केल्या नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. कोल्हेवाडी येथील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे.
रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साठून डास-माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. असेच चित्र खडकवासला, किरकटवाडी, नांदेड येथे आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अंतर्गत रस्त्यावर, तसेच नागरी वस्त्यांत साठत आहे. त्यात मैलापाणी, सांडपाण्याची भर पडत आहे. या परिसरात गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आशा साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
बहुतेक रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होत असल्याने साथीच्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील दहा रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय जिवाणु प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील पाच रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
खडकवासला, धायरी नांदेड किरकटवाडी परिसराची लोकसंख्या दोन लाखांहून अधिक आहे. त्यामुळे साठ वर्षापूवीच्या दोन लाखान का आराम वाट वीपीय जिया आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारीही पुरेसे नाहीत. दुसरीकडे कोट्यवधीचा कर वसूल करूनही या भागात अद्यापही महापालिका मूलभूत आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी देत नसल्याचे गंभीर वास्तव्य समोर आले आहे. यामुळे महापालिका केवळ कर गोळा करण्यासाठीच का, असा सवालही परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
खडकवासलासह कोल्हेवाडी परिसरातील सोसायट्या, लोकवस्त्यांत मोठ्या प्रमाणात डेंग्यू व इतर साथीच्या रोगाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. खासगी दवाखात रुग्णांची गदी होत आहे. सामान्य रुग्णांची आर्थकि लूट होत आहे. जिल्हा परिषद व महापालिकेने युद्धपातळीवर ताप व इतर आजार आटोक्यात आणण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना सुरू कराव्यात.
-सौरभ मते, माजी सरपंच, खादकवासला
समाविष्ट गावांत आरोग्य सेवा जिल्हा परिषदेच्या देण्यात येत आहेत. डेंग्यू व तापाचे रुग्ण असलेल्या परिसरात तातडीने औषधफवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-संदीप खलाटे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय