

बारामती; पुढारी वृत्तसेवा : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे एका शेतात अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाच्या महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. या बेवारस मयताबाबत कोणाला काही माहिती असल्यास शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे. याबाबत पोलिस ठाण्यात संदेश शिवराम भोपळे यांनी खबर दिली.
22 जानेवारी रोजी ते शेतामध्ये शेवरीचा पाला काढत असताना त्यांना हे प्रेत दिसून आले. त्यांनी पोलिसांना यासंबंधी खबर दिली. मयत महिलेच्या अंगावर फुलांची डिझाइन असलेली अबोली रंगाची साडी आढळून आली आहे. याबाबत कोणास काही माहिती असल्यास शहर पोलिस ठाण्याशी 9552069100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.