

दौंड: दौंड-पाटस रस्त्यावरील हॉटेल जगदंबा येथे सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले आहेत. या हॉटेलमध्ये जवळपास 12 ते 13 सिलेंडर होते त्यातील काही व्यवसायिक तर काही घरगुती होते स्फोट इतका मोठा होता की संपूर्ण हॉटेलच्या काचा फुटून बाहेर पडल्या तसेच हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दौंड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली व पोलिसांनी स्वतः जवळपास 12 ते 13 सिलेंडर बाहेर काढले चौघा जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.