

Daund Man Killed Over Love Marriage with Sister
दौंड: दौंड शहरात अनंत चतुर्थी म्हणजेच शनिवारी (दि. ६) पहाटे बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून केतन विनोद सुडगे या युवकाचा धारदार शस्त्र, विटा व दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यामुळे दौंड शहरात एकच खळबळ उडाली याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केतन सोडगे याने दीक्षा सोनवणे तिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. (Latest Pune News)
त्याचा राग मनात धरून शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास निखिल सुनील चितारे, प्रेम तुषार जाधव, विवेक विनोद कांबळे, विक्रांत विनोद कांबळे यांनी केतन सोडगे याला सतीश सोनवणे यांच्या घराजवळ गाठून त्याचा खून केला. पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.