Daund Illegal Gender Test Racket: दौंड लिंगनिदान रॅकेटमध्ये मोठी कारवाई, सदिच्छा शिंदे अटकेत

बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात SIT तपासाला गती; महिलांना फसवून नेटवर्क चालवल्याचे धक्कादायक खुलासे समोर
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

केडगाव: दौंड तालुक्यात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर लिंगनिदान व स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणातील तपासाला मोठे यश मिळाले असून, रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराची जवळची मदतनीस असलेल्या सदिच्छा दिलीप शिंदे ऊर्फ सदिच्छा लक्ष्मण भोसले (वय २३) हिला यवत पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण रॅकेटच्या कार्यपद्धतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Arrested
Daund Illegal Sex Determanation Case: दौंड गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणात अण्णासाहेब गिरीच्या मालमत्तांवर संशयाचे सावट

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी डॉ. संगीता गायकवाड यांच्या पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान तसेच तांत्रिक तपासातून सदिच्छा शिंदे हिची भूमिका स्पष्ट झाली. ती कथित मुख्य सूत्रधार व बनावट डॉक्टर अण्णासाहेब गिरी याच्या थेट संपर्कात राहून संपूर्ण रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होती.

Arrested
Pune Water Crisis: पुण्यात पाणी संकटाचा उद्रेक

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सदिच्छा शिंदे ही गर्भवती महिलांना त्यांच्या घरातून तसेच शिंदवणे (ता. हवेली) येथील फार्महाऊस आणि सीताई हाके नगर हडपसर येथील फ्लॅटवर आणत असे. या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशिनच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केले जात असल्याचा आरोप आहे.

Arrested
Maharashtra Smart Meter Benefits: स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा; बिल त्रुटी आणि तक्रारी कमी होणार

याशिवाय, या बेकायदेशीर व्यवसायातून मिळणारी रक्कम सदिच्छा शिंदे हिच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. गर्भातील अपत्य मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित महिलांना केडगाव येथील पार्थ हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपातासाठी पाठवले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. गर्भपाताच्या प्रक्रियेदरम्यानही सदिच्छा शिंदे प्रत्यक्ष उपस्थित राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Arrested
Pune Metro PMPML Integration: पुणे मेट्रो-पीएमपी तिकीट इंटिग्रेशनला वेग; एकाच तिकिटावर प्रवास शक्य होणार

या प्रकरणाचा तपास सुरू असून, रॅकेटशी संबंधित इतर आरोपी व सहकाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news