Daund Illegal Sex Determanation Case: दौंड गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणात अण्णासाहेब गिरीच्या मालमत्तांवर संशयाचे सावट

अण्णासाहेब गिरीच्या कोट्यवधी मालमत्तांवर संशय; आर्थिक व्यवहार व राजकीय संबंधांची चौकशी सुरू
Fetal Determination
Fetal DeterminationPudhari
Published on
Updated on

केडगाव: दौंड तालुक्यात गाजत असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असतानाच या प्रकरणातील कथीत मुख्य सूत्रधार अण्णासाहेब गिरी याच्या आर्थिक साम्राज्याबाबत नवे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गिरीने अल्पावधीत उभारलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता आणि त्यामागील आर्थिक स्रोत याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, त्याच्या या ‘सोनेरी लंके’ ला नेमके कोणाचे राजकीय संरक्षण मिळाले होते, याचीही उत्सुकता वाढली आहे.

Fetal Determination
Pune Water Crisis: पुण्यात पाणी संकटाचा उद्रेक

स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, गिरीने अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ही’ सोनेरी लंका’ उभारली आहे. अनेक व्यावसायिक मालमत्ता यामध्ये असल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः पारनेर एमआयडीसी आणि वाळुंज एमआयडीसी परिसरात उभारलेल्या काही व्यावसायिक इमारतींशी त्याचा संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Fetal Determination
Maharashtra Smart Meter Benefits: स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा; बिल त्रुटी आणि तक्रारी कमी होणार

याशिवाय, अहिल्यानगर जिल्ह्यातील एका प्रभावशाली राजकीय नेत्याशी गिरीचे निकटचे संबंध असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. त्या नेत्याच्या कथीत पाठबळावरच गिरीने आपली ही ‘सोन्याची लंका’ उभारून आपले आर्थिक जाळे विस्तारल्याचा दावा काही स्तरांतून केला जात आहे. कोविड काळात त्या नेत्याच्या सांगण्यावरून गिरीने लाखो रुपयांच्या देणग्या दिल्याचीही चर्चा सुरू असून, या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाल्यास काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येऊ शकतात, असे बोलले जात आहे.

Fetal Determination
Pune Metro PMPML Integration: पुणे मेट्रो-पीएमपी तिकीट इंटिग्रेशनला वेग; एकाच तिकिटावर प्रवास शक्य होणार

दरम्यान, गिरीच्या आर्थिक व्यवहारांमागील निधीचा स्रोत, मालमत्तांची उभारणी, कथीत गुंतवणूक आणि संभाव्य राजकीय संबंध यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या गुन्ह्यांबरोबरच या प्रकरणातील आर्थिक साखळी आणि त्यामागील लाभार्थी यांचाही शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Fetal Determination
Nasrapur Case: नसरापूर चिमुकली हत्या प्रकरणात मोठी घडामोड; आरोपीची सीसीटीव्हीवर कबुली, न्यायालयात सुनावणी निर्णायक टप्प्यावर

राजकीय आश्रयाच्या चर्चांना उधाण

या प्रकरणात अनेक आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि कथीत राजकीय संपर्क याबाबत विविधस्तरांवर चर्चा सुरू असल्याने तपासाचा आवाका आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांनी आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी केल्यास या प्रकरणाशी संबंधित आणखी काही महत्त्वाचे पैलू समोर येऊ शकतात, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news