Daund Health Department: दौंडच्या आरोग्य विभागाला कर्मचाऱ्यांची वानवा; ७८ पदे रिक्त, १२३ जणांवर आरोग्यसेवेचा भार

मंजूर २०१ पदांपैकी केवळ १२३ कर्मचारी कार्यरत; आरोग्य सेवकांच्या ६५ जागा रिक्त, ग्रामीण आरोग्य व्यवस्था ताणाखाली
Daund Health Department
Daund Health DepartmentPudhari
Published on
Updated on

विनोद गायकवाड

पांढरेवाडी: दौंड तालुक्यातील आरोग्य विभागात विविध संवर्गातील तब्बल ७८ पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंजूर २०१ पदांपैकी केवळ १२३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा मोठ्या ताणाखाली येण्या ची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Daund Health Department
Bhimashankar Temple: श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भीमाशंकरात भक्तीचा महापूर; अडीच लाख भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन

दौंड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रातील आरोग्य सेवक (महिला) या पदांच्या सर्वाधिक ५३ जागा रिक्त आहेत. तर आरोग्य सेवक (पुरुष) पदांच्या १२ जागा रिक्त आहेत. याशिवाय आरोग्य सहाय्यक पुरुष, आरोग्य सहाय्यक महिला, परिचर आणि कनिष्ठ सहाय्यक या पदांमध्येही रिक्त जागा आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

Daund Health Department
Pune Water Supply Shutdown: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद

ग्रामीण भागात माता-बाल आरोग्य, लसीकरण, संसर्गजन्य रोगांचे सर्वेक्षण, कुटुंब कल्याण योजना तसेच विविध आरोग्य मोहिमा राबविण्याची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांवर असते. मात्र, मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. आरोग्य विभागात मंजूर पदांपैकी जवळपास ४० टक्के पदे रिक्त असल्याने नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Daund Health Department
Manjari Tribal Students Protest: मांजरीतील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे १२ दिवसांपासून बेमुदत उपोषण; मागण्यांसाठी सरकारकडे धाव

विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना याचा अधिक फटका बसत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, रिक्त पदे भरण्याबाबत शासन आणि आरोग्य प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोग्यसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या या पदांची भरती लवकर झाल्यास तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

Daund Health Department
Pune Koregaon Park Civic Issues: कोट्यवधींचा निधी खर्चूनही कोरेगाव पार्क, पुणे स्टेशन परिसरातील समस्या कायम; मनपा कर्मचाऱ्यांच्या कामाचे ऑडिट करण्याची मागणी

दौंड तालुक्यातील आरोग्य विभागाच्या रिक्त पदांच्या भरतीबाबतचे प्रकरण कोर्टात आहे. उर्वरित काही पदोन्नतीची पदे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसांत ती भरण्यात येतील.

वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news