

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : मैत्री संस्था, बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, तेरखेडा, संजय काटे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संजय काटे, रवीद्र कांबळे, संतोष काटे, विजय शिंदे, दीपक साळवे आदी उपस्थित होते. या वेळी काटे म्हणाले, की भारतात प्राचीन काळापासून भगवान शिवाची उपासना होत आली आहे.
नंदी हा भगवान शिवाचे वाहन आणि शिष्य. कृषीप्रधान भारतात वृषभ (बैल) हा शेतकर्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.वृषभाला नंदीच्या रूपात पूजण्याची प्रथाही भारतात प्राचीन काळापासून आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बाईत यांनी केले.
भोसरी : पुढारी वृत्तसेवा : महात्मा बसवेश्वर हे सुधारणावादी संत होते. त्यांनी मानवतावादी-विज्ञानवादी विचार रुजवण्याचे कार्य केले. आजच्या काळात महात्मा बसवेश्वर यांचे विचार जोपासल्यास समाजासमाजातील जातीय तेढ दूर होऊन राष्ट्रीय ऐक्य टिकवता येईल, असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर विचार प्रसारक व प्रचारक बसवराज कणजे यांनी व्यक्त केले.
महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक संजय वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक रवी लांडगे, चंद्रकांत रासकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवा प्रतिष्ठाण व संजय वाबळे प्रतिष्ठाण यांनी केले होते.