Pune News
दामिनी मार्शलच्या धैर्याने उजळली मुलींची दुनियाPudhari

Pune News: दामिनी मार्शलच्या धैर्याने उजळली मुलींची दुनिया; तीन मुलींना नवे जीवन

पुन्हा खुले झाले शाळेचे दार
Published on

पुणे: समाजात अजूनही काही मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. पण कोंढव्यातील एका मुलीच्या हृदयस्पर्शी आर्त हाकेला दामिनी मार्शलनी प्रतिसाद दिला आणि एका लहानगीचे आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे वळले अन् तीन लहान मुलींना पुन्हा शाळेचे दार खुले होऊन मुलींचे आयुष्य उजळले.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोंढवा पोलिस ठाण्यातील दामिनी आयोध्या चेचर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या शाळेत शिकणारी एक हुशार विद्यार्थिनी अचानक अनुपस्थित राहू लागली होती. (Latest Pune News)

Pune News
Bike Showroom Fire: बंडगार्डन रस्त्यावर दुचाकी शोरूमला आग; 60 दुचाकी जळाल्या

चौकशी केली असता मुलीच्या शिक्षकांनी सांगितले की, ती मुलगी घाबरलेली आहे, काहीतरी अडचण तिला सतावत आहे. त्यानंतर दामिनी मार्शल शाळेच्या मुख्याध्यापकांसह थेट मुलीच्या घरी पोहोचल्या. घराला कुलूप होते. तरीही आत आवाज दिल्यावर ती मुलगी आणि तिची लहान बहीण सापडल्या. संवाद साधताच मुलीच्या डोळ्यात अश्रू होते, तर दुसरीकडे ती खरी परिस्थिती सांगत होती.

तिने सांगितले, आम्ही तीन बहिणी आहोत. आई त्यांना घरात बंद करून दररोज भीक मागायला नेत होती. खेळण्याचे, शिकण्याचे वय असताना त्या मुलींना रस्त्यावर उभे राहावे लागत होते. मलाही इतर मुलांसारखे शाळेत जायचे आहे, शिकायचे आहे, हे वाक्य ऐकून दामिनी मार्शल अधिक निर्धाराने उभ्या राहिल्या.

यानंतर दोन- तीन दिवस मुलींच्या आईवर लक्ष ठेवले गेले. पुरावे गोळा करून पोलिस स्टेशनमध्ये ती महिला हजर करण्यात आली. कठोर समज देऊन मुलांना शाळेत पाठवण्यास सांगितले. पुढे शाळा व पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर मुली पुन्हा शाळेत दाखल झाल्या.

समाज आणि पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच तीन निरागस जिवांचे भविष्य अंधारातून प्रकाशाकडे वळले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे निरीक्षक वर्षा देशमुख आणि दामिनी मार्शल आयोध्या चेचर यांच्या प्रयत्नातून पुन्हा मुलींच्या आयुष्याला दिशा मिळाली.

Pune News
Engineering MBA Admission: ‘अभियांत्रिकी, एमबीए’च्या चौथ्या फेरीला सुरुवात!

आज त्या आनंदाने शिक्षण घेत आहेत. आमच्या प्रयत्नांना यश आलं, हेच खरं समाधान आहे. संवेदनशीलतेने पावले उचलली तर मुलींच्या आयुष्यातील अंधार दूर होऊ शकतो. बेटी बचाव, बेटी पढाव ही योजना फक्त घोषणांपुरती न राहता प्रत्यक्षात उतरताना या घटनेतून दिसून आली.

- आयोध्या चेचर, दामिनी मार्शल, कोंढवा पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news