दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : वाघेश्वर, तिरंगा स्पोर्ट्स क्लब संघांची आगेकूच

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : वाघेश्वर, तिरंगा स्पोर्ट्स क्लब संघांची आगेकूच
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आयोजित 'राईज अप' महिलांच्या कबड्डी स्पर्धेच्या खुल्या गटामध्ये वाघेश्वर, वाघोली तर तिरंगा स्पोर्ट्स क्लब संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत आगेकूच केली. सब ज्युनियर 16 वर्षांखालील गटामध्ये ब्रम्हा-विष्णू-महेश आणि अभिनव संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजय मिळविला.

दै. 'पुढारी' आयोजित या स्पर्धा नेहरू स्टेडियमच्या कबड्डी मैदानावर सुरू आहेत. उद्घाटनानंतर महिलांच्या खुल्या गटातील पहिल्या सामन्यामध्ये वाघोलीच्या वाघेश्वर संघाने शिवाई क्रीडा मंडळाचा 39 गुणांनी पराभव करीत आगेकूच केली. या सामन्यामध्ये वाघेश्वर संघाने शिवाई क्रीडा मंडळाचा 56-17 अशा गुणफरकाने पराभव केला. या सामन्यामध्ये वाघेश्वर संघाच्या वैभवी जाधव हिने उत्कृष्ट पकड तर साक्षी सोनवणे हिने उत्कृष्ट चढाई केली.

शिवाई क्रीडा मंडळाच्या वतीने मधुरा गायकवाड हिने उत्कृष्ट चढाई तर प्राची खंडागळे हिने उत्कृष्ट पकड केली. दुसर्‍या सामन्यामध्ये तिरंगा स्पोर्ट्स क्लब संघाने दिघीच्या नवजीवन स्पोर्ट्स संघाचा 39-5 असा 34 गुणांच्या फरकाने पराभव करीत दणदणीत विजय मिळविला. विजयी तिरंगा स्पोर्ट्स क्लब संघाच्या वतीने साक्षी रेणुसे हिने उत्कृष्ट पकड तर रिया धुमाळ हिने उत्कृष्ट चढाई केली.

सब ज्युनियर 16 वर्षांखालील गटामध्ये ब्रम्हा-विष्णू-महेश संघाने शिवमुद्रा स्पोर्ट्स क्लब संघाचा 54-27 असा तब्बल 27 गुणांच्या फरकाने पराभव करीत आगेकूच केली. या सामन्यामध्ये ब्रम्हा-विष्णू-महेश संघाच्या पूनम जाधव हिने उत्कृष्ट पकड तर साधना पंढुरे हिने उत्कृष्ट चढाई केली. शिवमुद्रा स्पोर्टस क्लब संघाच्या वतीने विद्या गायकवाड हिने उत्कृष्ट पकड केली.

दुसर्‍या सामन्यामध्ये अभिनव संघाने सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठान संघाचा 35-7 असा 28 गुणांच्या फरकाने पराभव करीत दणदणीत विजय मिळविला. या स्पर्धेमध्ये अभिनव संघाकडून सिध्दी काळे हिने उत्कृष्ट चढाई तर ऐश्वर्या जंबोकर हिने उत्कृष्ट पकड केली. सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठानच्या अक्षदा भोसले हिने उत्कृष्ट चढाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news