

Dahi Handi Traffic Update
पुणे: श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडी उत्सवानिमित्त दोन दिवस शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून बदल करण्यात आला आहे. आज शुक्रवारी (दि. 15) आणि उद्या शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर दहीहंडीची गर्दी कमी होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान, दहीहंडीनिमित्त शहरात पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात केला आहे. 10 पोलिस उपायुक्त, 16 सहायक पोलिस आयुक्त, 80 पोलिस निरीक्षक, 350 पोलिस उपनिरीक्षक आणि 3500 पोलिस कर्मचारी हे बंदोबस्तावर हजर असणार आहेत. (Latest Pune News)
बंडगार्डन वाहतूक विभाग
16 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत करण्यात येणार आहेत. तीन तोफा चौक ते ब्ल्यू नाइल चौक इस्कॉन मंदिरासमोरून जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग : ब्ल्यू नाइल चौक ते तीन तोफा चौकाकडे जाणारा मार्ग हा दुतर्फा वाहतूक करण्यात येईल
कोंढवा वाहतूक विभाग
15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 16 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.गगनउन्नती चौक येथील यू टर्न बंद करण्यात येत आहे. केसर लॉजजवळील यू टर्न बंद करण्यात येत आहे. खडीमशिन पोलिस चौकी ते श्रीराम चौक या रोडवरील वाहतूक बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहनांनी खडी मशिन चौकातून यू टर्न घेऊन इस्कॉन मंदिराच्या पार्किंगकडे जावे व अन्य वाहनांनी इच्छित स्थळी जावे.
वानवडी वाहतूक विभाग
16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 ते गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.शिवरकर रोड वरील वाहतूक बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहनांनी संविधान चौकातून डावीकडे वळून सनग्रेस स्कूलमार्गे साळुंखे विहार रोडने इच्छित स्थळी जावे व येणारी वाहतूक त्याच रोडने येईल.
संविधान चौकाकडून उजवीकडे जाणारी वाहने ही फ्लॉवर व्हॅली लेनकडून केदारी पेट्रोल पंपपुढे इच्छित स्थळी जातील.
साळुंखे विहार रोडने येणारी वाहने संविधान चौकातून डावीकडे न वळता उजवीकडे वळून फ्लॉवर व्हॅली लेन कडून केदारी पेट्रोल पंप पुढे इच्छित स्थळी जातील.
16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 ते गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने / शास्त्री रोडने इच्छित स्थळी जावे.
पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी. रोडने इच्छित स्थळी जावे. तसेच सणस पुतळा चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जावे.
स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने - झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
बुधवार चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येईल. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाईल.
रामेश्वर चौक ते शनीपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत असून पर्यायी मार्गाचा वापर करावा.
सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जातील.
शिवाजी रोडवरून जिजामाता चौकातून गणेश रोडने दारूवाला पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक पवळे चौक जुनी साततोटी पोलिस चौकीमार्गे इच्छितस्थळी जाईल.
गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक दारूवाला पूल येथून बंद राहील. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारूवाला पूल, दूधभट्टी या मार्गाचा वापर करावा.
सोन्या मारुती चौकातून मोती चौक व फडके हौद चौकाकडे वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.
विजयमारुती चौकातून उजवीकडे वळून पासोडा विठोबा मंदिर मोतीचौक डावीकडे वळून फडके हौदमार्गे इच्छितस्थळी जावे.