Arabian Sea cyclone | अरबी समुद्रात २६ तारखेला चक्रीवादळाची शक्यता; राज्यात आजपासून मध्यम पावसाचा अंदाज

वादळाचा रोख मुंबईच्या दिशेने असल्याचा अंदाज
Arabian Sea cyclone |
Arabian Sea cyclone | अरबी समुद्रात २६ तारखेला चक्रीवादळाची शक्यता; राज्यात आजपासून मध्यम पावसाचा अंदाज
Published on: 
Updated on: 

पुणे: अरबी समुद्रात सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) चक्रीवादळाची शक्यता असून ते रत्नागिरीच्या सागरात वेग घेऊन मुंबईच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात शुक्रवारपासून मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी (१५ ऑक्टोबर) मान्सून देशातून माघारी फिरला. यंदा ऑक्टोबरमध्ये तब्बल ६९ टक्के पावसाची तूट नोंदली गेली.

यंदा अल निनोच्या प्रभावाने पाऊस कमी झाला. तशाच अवस्थेत मान्सूनने शुक्रवारी संपूर्ण देशातून माघार घेतल्याची घोषणा हवामान विभागाने केली, तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे वृत्त आहे. हे चक्रीवादळ रत्नागिरीच्या समुद्रात २६ ऑक्टोबर रोजी तयार होणार असून, त्याचा रोख मुंबईच्या दिशेने असल्याचा प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Arabian Sea cyclone |
Pune Graduate Constituency Election: पदवीधर,शिक्षक मतदारांना उद्या विशेष रजा; खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना 2 तासांची सवलत

चक्रीवादळचा अंदाज सप्टेंबरमध्येच शास्त्रज्ञांनी वर्तवला

यंदा परतीचा मान्सून माघारी फिरताच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सलग तीन चक्रीवादळे निर्माण होतील असा अंदाज सप्टेंबरमध्येच शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. त्याप्रमाणे पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात रत्नागिरीजवळ २६ रोजी तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान राज्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. २६ रोजी चक्रीवादळाची निर्मिती होताच पावसाचा जोर वाढू शकतो.

Arabian Sea cyclone |
Pune MLC Election: महायुतीच्या उमेदवारांना विजय करण्याचा आ. गोरखे यांचा संकल्‍प; संत तुकारामनगर, कासारवाडी, खराळवाडी मंडळाचा पाठिंबा

मान्सूनने देश सोडला

परतीच्या मान्सूनचा प्रवास यंदा पश्चिम राजस्थानातून ५ सप्टेंबर रोजी सुरू झाला. मात्र, अल निनोच्या जबरदस्त प्रवासामुळे न बरसताच त्याने १५ ऑक्टोबर रोजी देशाचा निरोप घेतला. त्यामुळे १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान तब्बल ६९ टक्के पावसाची तूट नोंदली गेली. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.

राज्यात उन्हाचा तडाखा सुरूच

मान्सूनने वेळेपूर्वी पाच ते सहा दिवस आधी देशातून निरोप घेतल्याने पाऊस कमी बरसला. त्यामुळे उन्हाचा तडाखा सुरू आहे. गुरुवारी राज्यात रत्नागिरी येथे ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.