पुणे : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. मासेमारी बंद झाल्याने गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक रोडावली आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने मासळीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर आवक जावक कायम असल्याने मटण, चिकन, गावरान आणि इंग्लिश अंड्यांचे दर स्थिर होते.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि.11) खोल समुद्रातील मासळीची 7 ते 8 टन, खाडीची 200 ते 250 किलो, तर नदीच्या मासळीची 200 ते 400 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 10 ते 12 टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1500-1600, मोठे : 1400, मध्यम : 1000-1100, लहान : 750-800, भिला : 500-550, हलवा : 500-550, सुरमई : 550-600, रावस : 500-550, घोळ : 700-800, करली : 240-280, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 280-320, पाला : 900- 1000, वाम : 600-650, ओले बोंबील : 160-180. कोळंबी : लहान 180-280, मोठी : 360-550, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 700-750, लॉबस्टर : 1800- 2000, मोरी : 240-280, मांदेली : 100-140, राणीमासा : 160-200, खेकडे : 280-320, चिंबोर्या : 480-600. खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 160-200, नगली : 400-440, तांबोशी : 400-440, पालू : 240-280, लेपा : 160-200, बांगडा : 140-180, शेवटे : 240-280, पेडवी : 100, बेळुंजी : 120-140, खुबे : 120-140, तारली : 100-120. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 180-200, मरळ : 440-480, शिवडा : 280, खवली : 300-320, आम्ळी : 140-160, खेकडे : 400, वाम : 600. मटण: बोकडाचे :700, बोलाई: 700, खिमा :700, कलेजी : 740, चिकन: 200, लेगपीस : 260, जिवंत कोंबडी: 140, बोनलेस : 300. अंडी : गावरान (शेकडा) 930, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 590, डझन 84, प्रतिनग 7.